नलिनीच्या मोबाईलची चौकशी

April 21, 2010 12:25 PM0 commentsViews: 3

21 एप्रिल

राजीव गांधी हत्या प्रकरणी जेलमध्ये असणार्‍या नलिनीच्या फोन रेकॉर्डस्‌ची आता चौकशी होणार आहे.

तामीळनाडू सरकार ही चौकशी करणार आहे.

जेलमध्ये असणार्‍या नलिनीकडे मोबाईल सापडल्याने खळबळ उडाली होती.

19 वर्षांपासून नलिनी वेल्लोरे येथील जेलमध्ये आहे. नलिनीने मोबाईलद्वारे परदेशात फोन केले का याची चौकशी होणार आहे.

तिच्याकडील मोबाईल तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे.

close