करिनाचं वार्षिक उत्त्पन्न फक्त सात लाख !

October 1, 2016 2:20 PM0 commentsViews:

kareena_kapoor_3201 ऑक्टोबर : बॉलिवूडचे अनेक सिनेमे आणि छोट्या पडद्यावर दिसणा•या जाहिरातींमध्ये दिसणा•या करिना कपूर खानचं वार्षिक उत्त्पन्न सात लाख रूपये आहे असं कुणी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का ? करिनाने आयकर विभागात दिलेल्या विवरणपत्रातून ही बाब उघड झाली आणि एकच खळबळ उडाली.

झालं असं की करिनाच्या आयकर अकाऊंट नंबर आणि पॅन कार्ड नंबरचा दुरूपयोग करून कुणातरी ऑगस्ट महिन्यातच आयकर विवरण सादर केलंय. यात तिचं वार्षिक उत्त्पन्न सात लाख रूपये एवढंच दाखवण्यात आलंय 30 सप्टेंबरनंतर करिना स्वतःचा आयकर भरण्यासाठी गेली असता ही धक्कादायक बाब तिला कळली. त्यानंतर तिला आपली ही दोन्ही अकाऊंट हॅक झाल्यामुळे तसं घडल्याचं समजलं. अखेर हताश होऊन करिनाने मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा