अखेर बबनराव पाचपुतेंचा साईकृपा कारखाना जप्त

October 1, 2016 2:28 PM0 commentsViews:

babanrao pachapute4401 आॅक्टोबर : भाजप नेते बबनराव पाचपुते यांना मोठा धक्का बसलाय. बबनराव पाचपुते यांचा हिरडगावचा साईकृपा कारखाना अखेर जप्त करण्यात आलाय. पंजाब नॅशनल बॅकेनं कारखान्याचा तत्त्वत ताबा घेतलाय. प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे.

बबनराव पाचपुते यांचा मुलगा विक्रमसिह पाचपुते अध्यक्ष असलेल्या साईकृपा फेज 2 या खाजगी साखर कारखान्यासाठी त्यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून 287 कोटी 60 लाख 38 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण कारखाना डबघाईला आल्याने हे कर्ज आपण फेडू शकत नाही असं पाचपुतेंनी सांगितलं होतं. अखेर बँकेने पाचपुतेंच्या संपत्तीची जप्ती करण्याची कारवाई केली. तसंच तारण ठेवलेला देवदैठणचा दुसरा कारखाना आणि श्रीगोंदा शहरातील माऊली निवासस्थानही जप्त होणार आहे. पाच दिवसापूर्वीच जाहीर करुन ताबा घेतल्याची माहिती देण्यात आलीये. शेतक•ऱ्यांच्या थकीत 35 कोटीसाठी सरकारनं पूर्वीच्या जप्तीची कारवाई केली होती. मात्र त्यास कारखान्यानं उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तर थकबाकी न भरल्यानं 23 मार्चला बँकेनं प्रतीकात्मक ताबा घेतला होता. शिवाय पाचपुतेंनी ऍक्सिस बँकेकडूनही 13 कोटी 20 लाखांचं कर्ज घेतलं होतं. या बँकेनेही बबनराव पाचपुतेंना वसुलीची नोटीस बजावली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा