ग्राफीक्सद्वारे महिषासुर मर्दिनीची कथा

October 1, 2016 5:34 PM0 commentsViews:

पितृपक्ष संपल्यानंतर देवीपक्षाच्या सुरुवात होताच आपल्याला दुर्गापुजेचे वेध लागतात. आर्टीस्ट प्रेरणा मित्रा आणि राज यांच्या कलेतून पाहुयात की दुर्गा देवी कशी महिषासुर मर्दिनी बनली.

ही कथा सुरू झाली असुराधिपतीपासून. त्याचे राक्षसकन्या श्यामलावर प्रेम होते आणि तीला शापामुळे म्हशीचे रुप मिळाले होते.महिषासुर हा त्यांचेच अपत्य.

असूर असल्याने नक्कीच देवगण महिषासुराशी वैर घेऊन होते. त्याने देवांना नामोहरण करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. स्वर्गातील देवांवर हल्ले करताना तो त्याची रुप बदलण्याच्या शक्तीचा वापर सतत करत असे. ही क्षमता असुनही सर्व देवांच्या एकीमुळे असुरांवर जय मिळवण्यात तो कधीही यशस्वी होत नव्हता.त्यांची ही अशी युद्ध अनेक वर्ष सुरू राहिली मात्र तो काही स्वर्गावर विजय मिळवू शकला नाही. काय केले म्हणजे त्यांच्यावर मात करता येईल ,याचा विचार तो सतत करीत असे.

याच प्रयत्नात त्याने तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करुन घेतले. ब्रह्मदेव वरदान देण्यास तयार होते मात्र महिषासुराला अमरत्व हवे होते.
यासाठी मात्र देवांचा आक्षेप होता. यावर त्याने असा वर मागितला की, कोणत्याही पुरुषाकडून त्याचा नाश होऊ शकत नाही. मानव,देव,दानव,पशु.(कारण कोणत्याही स्त्रीकडून त्याला काही धोका आहे ,असे त्याला वाटत नव्हते.)

मात्र त्या वरदानास एक महत्त्वाचा अपवाद होता तो म्हणजे स्त्री. असे वरदान मिळाल्यानंतर तो निर्भय झाला. स्वर्ग,पाताळ आणि पृथ्वीवर त्याने उच्छाद मांडला.तो सर्वांना भंडावून सोडू लागला. त्याने त्याच्या गणांसह सगळीकडे आपली दहशत प्रस्थापित केली.

देवांनी स्वर्ग सोडून पृथ्वीवर राहणे सुरू केले मात्र त्यांचा त्रास काही संपला नाही.महीषासुराला अडविणारे कोणी नव्हते, त्याला वरदान देणारे, सृष्टीचे निर्माते ब्रम्हदेवसुद्धा नाही. ‘कोणीही दैत्यांची पूजा करणार नाही,फक्त मीच देव आहे.’ ,असं तो म्हणू लागला. त्याची दहशत आणि शक्ती वाढतच होती. तो सर्वशक्तीमान दानव सगळीकडे राज्य करु लागला. देव अशी अपेक्षा करुन होते की ब्रम्हदेवाकडे यावर उपाय असेल मात्र हे त्यांच्याही हाताबाहेर असल्याचे त्यांनी कबूल केले.

स्वर्गावर विजय मिळविण्यात ते असहाय्य होते. देवांना वाटले की विष्णुदेवतरी आपले तारणहार ठरू शकतील किंवा भगवान शंकर तरी ??अशाप्रकारे ब्रह्मा,विष्णु आणि महेश असे त्रिदेव एकत्र येऊन त्यांनी जे रुप घेतले ते म्हणजे दुर्गा. ह्या देवीच्या दहाही हातात अनेक आयुधं आहेत. उदा.विष्णु चक्र,त्रिशुळ,कमंडलु,गदा, नाग,कमळ,धनुष्य,शंख इ.पशुंचा राजा सिंह त्यांचे वाहन झाला.

स्त्रीकडून पराभव होईल असा त्याने विचारही केला नव्हता. ती शक्यताही त्यांच्या मनात आली नव्हती. तो आपला विजय गृहीत धरुन होता. तो निश्चिंत होता. त्याने सुरुवातीला दुर्गेवर चाल करण्यासाठी चंद,मुंड आणि रक्तबीज यांसारख्या त्याच्या सेवकांना चाल करुन पाठविले मात्र ते हरले.

मग महिषासुराने त्यात उडी घेतली. त्याने म्हैस,सिंह,पुरुष आणि हत्ती अशी अनेकविविध रुप घेतली. प्रत्येकवेळी त्याचा पाडाव झाला. शेवटी म्हशीचे रुप घेताना दुर्गा देवीने त्याला शेवटचा मोठा दणका दिला. अशाप्रकारे त्यांनी तिन्ही सृष्टींना या असुराच्या संकटातून सोडविले आणि पुन्हा सुराज्य स्थापन केले. महिषासुराच्या त्रासाने ग्रासलेले सर्वच आत्ता दुर्गेच्या विजयाने आनंदीत होते.महीषासुराचा वध केला म्हणून तिला महिषासुरमर्दीनी म्हटले जाऊ लागले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा