दंगलखोर गावे तंटामुक्तीत नाहीत

April 21, 2010 12:39 PM0 commentsViews: 4

21 एप्रिल

धार्मिक किंवा राजकीय दंगलीची पार्श्वभूमी असणारी गावे तंटामुक्ती योजनेत घेतली जाणार नाहीत, अशी घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी विधान परिषदेत केली.

या योजनेच्या नियमात बदल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खैरलांजी गावाला नुकताच तंटामुक्तीचा पुरस्कार देण्यात आला. त्यावरून काल विधानपरिषदेत चांगलाच गदारोळ झाला होता.

close