गिरणी कामगारांच्या एकाही मुलाला नोकरी नाही

April 21, 2010 12:51 PM0 commentsViews: 2

21 एप्रिल

गिरणी कामगारांच्या मुलांना गेल्या 11 वर्षांत एकही नोकरी देता आलेली नाही, अशी धक्कादायक कबुली आज नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दिली.

एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या धर्तीवर गिरणी कामगारांच्या मुलांसाठी 11 वर्षांपूर्वी एक समिती स्थापन करण्यात आली होती.

या समितीच्या माध्यमातून सरकारी किंवा खाजगी ठिकाणी या मुलांना नोकरी देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.

पण गेल्या 11 वर्षांत एकाही मुलाला नोकरी देता न आल्याची कबुली आज सरकारने दिली आहे.

close