गुजरातच्या पोरबंदरमध्ये आढळली पाकिस्तानी बोट; 9 जणं ताब्यात

October 2, 2016 5:32 PM0 commentsViews:

Gujrat boat sazda

02 ऑक्टोबर :  भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला. यातच भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानमधून गुजरातमध्ये आलेली संशयास्पद बोट ताब्यात घेतली असून त्यातील 9 जणांनाही ताब्यात घेतले आहे.

तटरक्षक दलाच्या जवानांना आज सकाळी ही संशयास्पद बोट आढळून आली. त्यानंतर ही बोट ताब्यात घेण्यासाठी बोटीला घेराव घालण्यात आला. त्यानंतर ती बोट ताब्यात घेण्यात आली. या पकडलेल्या सर्वांची कसून चौकशी करण्यात येत असून ते 9 जण मच्छिमार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पकडले गेलेल्या या सर्वांची पोरबंदरला नेऊन चौकशी करण्यात येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा