संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकरांच्या नव्या पक्षाची स्थापना

October 2, 2016 6:15 PM0 commentsViews:

506642-velingkar-party-ani

02 ऑक्टोबर : गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. गोवा सुरक्षा मंच या नव्या राजकीय पक्षाची वेलिंगकर यांनी स्थापना केल आहे. गोव्यात पत्रकार परिषद घेऊन वेलिंगकरांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे.

गोव्यातील मराठी आणि कोकणी भाषेच्या अनुदानावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोठी फूट पडली होती. याच मुद्यावरुन सुभाष वेलिंगकरांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर टीकेची झोड उठवली. मध्यंतरी वेलिंगकरांनी नवा पक्ष स्थापन करणार असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर आज त्यांनी आपल्या नव्या पक्षाची स्थापना केली.

दरम्यान, आगामी गोवा निवडणुका वेलिंगकर पूर्ण ताकदीनिशी लढवणार असून त्यांनी भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचं आव्हान दिलं आहे. या निवडणुकीत मातृभाषा अस्मिता या मुद्द्यावर शिवसनेशी युती करण्याचा निर्णय घेतल्याचं वेलिंगकर यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेनेही वेलिंगकर यांच्या पक्षाशी युती करण्यास सहमती दर्शवली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा