मराठ्यांच्या ‘राजधानीत’ आज घुमणार ‘#एकमराठालाखमराठा’चा एल्गार

October 3, 2016 11:16 AM0 commentsViews:

Satara maratha morcha

सातारा – 03 ऑक्टोबर : मराठ्यांची राजधानी म्हणून ओळख असलेल्या सातार्‍यात आज मराठा समाजाचा विराट मोर्चा निघणार आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजचे 13 वंशज खा. उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हेही या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री विजय शिवतरेही सातार्‍याच्या मोर्चात सहभागी होणार आहेत.

‘कोपर्डी’ घटनेतील नराधमांना कठोर शासन व्हावे, मराठा समाजाला आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत आहेत.  आज दुपारी 12 वाजता जिल्हापरिषद मैदानपासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर राधिका रोड, राजवाडा आणि नंतर पोवई नाका असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे.

गेल्या अनेक दिवसा पासून बैठका, मेळावे, गावसभांचा माध्यमातून मराठा बांधवांनी  मोर्चाची बांधणी केली आहे.  मोर्चासाठी पोलिसांनी पूर्ण तयारी केली असून तब्बल 2500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या मोर्चा साठी तैनात करण्यात आले आहेत.

संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत तयार झालेला माहोल पाहता हा मूक मोर्चा खर्‍या अर्थाने ‘न भूतो न भविष्यती’ असा होईल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा