छेड काढणार्‍या नौसैनिकाला अटक

April 21, 2010 1:18 PM0 commentsViews: 4

21 एप्रिल

मुलीची छेड काढल्या प्रकरणी कुलाबा इथे नौदलाच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे.

आयएनएस शिकराच्या गेट वर 4 ते 5 जवान दारू पिऊन उभे होते. त्यांच्या समोरून तेथील रहिवासी भगवान शहा आपल्या 14 वर्षांच्या मुलीसह घरी जात होते.

त्यावेळी जवानांपैकी विक्रम सिंग आणि उत्तम सिंग या जवानांनी त्या मुलीला शिकरा तळावरील गेटच्या आत खेचले.

शहा यांनी आपल्या मुलीला त्या जवानांच्या तावडीतून कसबसे सोडवले. त्या जवानांनी शहा यांना मारहाणीचा प्रयत्न केला.

यानंतर या भागातील संतप्त नागरिकांनी या जवानांच्या अटकेची मागणी करत रास्ता रोको केला.

close