सिनेकलाकारांना परांजपे पुरस्कार मिळावा

April 21, 2010 1:23 PM0 commentsViews: 5

21 एप्रिल

प्रभाकर पणशीकरांच्या नावाने जसा नाट्य क्षेत्रातील कलाकारांचा गौरव केला जातो, तसाच राजा परांजपे पुरस्काराने सिनेकलाकारांना सन्मानित केले जावे, अशी मागणी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी यांनी पुण्यात केली.

राजा परांजपे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या समारोपाच्या निमित्ताने पुण्यात राजा परांजपे फिल्म फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांना राजा परांजपे सन्मान प्रदान करण्यात आला.

यानिमित्ताने सुलोचनादीदींनी राजा परांजपेंसोबत काम करतानाच्या आठवणी सांगितल्या.

close