स्पेनमधल्या गोविंदांचे 9 थर!

October 3, 2016 5:02 PM0 commentsViews:

03 ऑक्टोबर :  स्पेनमधल्या टॅरागॉना प्रांतात स्पेनच्या गोविंदांनी रचलेले हे थरारक मनोरे. यावर्षी आपल्याकडे गोविंदांना दहिहंडीच्या चार थरांंपर्यंतच मर्यादा होती. 18 वर्षं वयाच्या खालच्या गोविंदांना दहिहंडी खेळायला कोर्टाने बंदी घातली होती. दहिहंडीच्या वेळी गोविंदांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न होते. त्यामुळे कोर्टाने हा निर्णय दिला. पण स्पेनमध्ये मात्र त्याच जल्लोषात आणि त्याच शिस्तीत मनोरे रचण्याची स्पर्धा झाली. अगदी बालगोविंदाही हिरीरीने या स्पर्धेत सहभागी झाले. या गोविंदांनी 9 मीटरपर्यंतची मजल मारली!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा