अभ्यास करायला सांगितले म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या

October 3, 2016 7:02 PM0 commentsViews:

saniya_shekhअंबरनाथ, 03 ऑक्टोबर : आपल्या पाल्याने शिकावं अशी साहिजिक अपेक्षा पालकांना असते. मात्र, अभ्यास करायला सांगितले म्हणून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडलीये. सानिया बशीर शेख असं या विद्यार्थिनीचं नाव आहे.

सानियाने सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन तिनं जीवन संपवलंय. सानिया रात्री उशिरा गरबा खेळून घरी आली होती. त्यावेळी सानियाच्या वडिलांनी तू 10 वीत आहेस, तुझे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय, अभ्यास कर असं सांगितलं. याचा राग मनात धरुन सानियानं सहाव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सानियाच्या कुटुंबियांना मानसिक धक्का बसला आहे. अंबरनाथ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा