राज ठाकरेंना विचारतंय कोण ?, नारायण राणेंचा घणाघात

October 3, 2016 7:50 PM0 commentsViews:

naryan_rane_Vs_raj03 ऑक्टोबर : आर्थिकदृष्ट्या आरक्षणावर बोलणाऱ्या राज ठाकरेंना विचारतंय कोण ? अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलीये. तसंच मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण देऊ नये अशी भूमिकाही राणेंनी मांडली.

ठाण्यात झालेल्या मनसेच्या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातपात मानत राहिलो तर महाराष्ट्राचा युपी, बिहार व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा देत आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांनाच आरक्षण द्यावं अशी मागणी केली होती. तसंच  गेली १० ते १५ वर्ष केंद्रात आणि राज्यात आघाडी सरकारची सत्ता होती.  त्यावेळीच त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठ्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर होत आहे. सर्वच पक्षांना फक्त आरक्षणाचं राजकारण करायचं आहे असा आरोपही राज यांनी केला होता,

राज ठाकरे यांच्या या मागणीचा नारायण राणेंनी चांगलाच समाचार घेतलाय. राज ठाकरेंच्या मागणीला विचारतंय कोण असा सवाल राणेंनी उपस्थित केलाय. मराठा समाजाला आता आर्थिक निकषांवर आरक्षण नको अशी भूमिकाही नारायण राणेंनी मांडलीये. राज ठाकरेंनी कधी कुणाच्या कानशिलात लगावलीये का ? असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा