मराठ्यांच्या राजधानीत घुमला ‘#एकमराठालाखमराठा’चा एल्गार

October 3, 2016 7:08 PM0 commentsViews:

satara_maratha_morcha03 ऑक्टोबर : मराठा समाजाची राजधानी समजल्या जाणा•ऱ्या साता•ऱ्यात आज (सोमवारी) मराठा समाजाच्या विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात लाखो मराठा समाजातील लोकं सहभागी झाले होते. आतापर्यंत निघालेल्या मोर्चांप्रमाणेच या मोर्चातही शिस्त पाहायला मिळाली.

शहरातील जिल्हा परिषदेपासून सुरू झालेला हा मोर्चा राधिका रोड, राजवाडा असं करत पोवई नाक्यापर्यंत पोहोचला. या मोर्च्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज खासदार उदयनराजे भोसले, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे , राज्यमंत्री विजय शिवतारे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हेही या मोर्चात सहभागी झाले होते.

यावेळी, उदयनराजेंनी ऍट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी केलीय. मराठा मोर्चांमध्ये आतापर्यंत एकवाक्यता होती. पण उदयनराजेंनी ऍट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी केल्यामुळे मोर्च्यात दोन मतप्रवाह पाहण्यास मिळाले. आतापर्यंत ऍट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा अशी मागणी मोर्चेक•यांनी लावून धरलीये. मात्र, उदयनराजेंच्या नव्या भूमिकेमुळे एकवाक्यता नसल्याचं स्पष्ट झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा