मुंबई पालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेमुळे दिग्गज नगरसेवकांचे वॉर्ड गेले

October 3, 2016 8:14 PM0 commentsViews:

mumbai_palikaमुंबई, 03 ऑक्टोबर : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर झालीय. शिवसेनेच्या आणि मनसे, काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना यामुळे दुसरा वॉर्ड शोधावा लागणार आहे. या सोडतीनंतर महापौर स्नेहल आंबेकर, किशोरी पेडणेकर या सेनेच्या दिग्गज नेत्यांचे वॉर्ड गेलेत. तर काँग्रेसचे प्रवीण छेडा, मनसेचे संदीप देशपांडे या सगळ्या नेत्यांचे वॉर्ड आरक्षित झाल्यामुळे त्यांना दुसरे वॉर्ड शोधावे लागणार आहेत.

वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात आज प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली. महापालिकेच्या 227 पैकी 15 वार्ड अनुसूचित जातीसाठी आरक्षित ठेवण्यात आलीये. आतापर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जाती- जमातींचं आरक्षण जाहीर झालंय. पण दुसरे वॉर्ड शोधण्याची प्रक्रिया त्यांच्यासाठी गुंतागुंतीची असणार आहे. अजून ओबीसी, महिला आणि खुल्या प्रवर्गाची सोडत निघायची आहे. त्यामुळे अजूनही अनेकांचा जीव टांगणीला लागलाय.

दिग्गज नगरसेवकांचे वॉर्ड गेले

शिवसेना – किशोरी पेडणेकर- नवा वॉर्ड शोधावा लागणार
शिवसेना – स्नेहल आंबेकर – नवा वॉर्ड शोधावा लागणार
काँग्रेस – प्रवीण छेडा – नवा वॉर्ड शोधावा लागणार
मनसे – संदीप देशपांडे – नवा वॉर्ड शोधावा लागणार
शिवसेना – यशोधर फणसे – नवा वॉर्ड शोधावा लागणार
भाजप – विनोद शेलार – नवा वॉर्ड शोधावा लागणार
शिवसेना – शीतल म्हात्रे- संधी मिळू शकते
शिवसेना – शुभा राऊळ – संधी मिळू शकते


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा