विष्णू सावरा निष्क्रिय, आदिवासींचा घरावर मोर्चा

October 3, 2016 8:39 PM0 commentsViews:

03 ऑक्टोबर : ‘कुपोषणामुळे मुलं मरताय तर असू दे की’ असं वक्तव्य करणा•ऱ्या आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांवर निष्क्रियतेचा आरोप करीत आदिवासींनी सावरा यांच्या वाड्यातल्या घरावर मोर्चा काढलाय. सावरा यांच्या घराला घेराव घालण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय.vishnu_savara

महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि इतर सामाजिक संघटनेचे आदिवासी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. सावरांच्या पालघरमधल्या वाडा इथल्या घराला घेराव घालण्यासाठी एकत्र जमले आहे. अजूनही मोर्चा सुरू आहे. आदिवासी शेतकरी, देवस्थान शेतकरी आणि जंगल निवासी जनतेचे प्रश्न अत्यंत गंभीर बनले आहेत. आदिवासी भागात बालमृत्यूचे थैमान सुरू आहे. त्यामुळे मागण्या मान्य केल्याशिवाय माघार घेणार नसल्याची घोषणा किसान सभेने केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा