शिवसेना कालिया नाग, विखे पाटलांचं टीकास्त्र

October 3, 2016 11:38 PM0 commentsViews:

vikhe_patil_4303 ऑक्टोबर : शिवसेनेच्या मुखपत्रात माझ्यावर खालच्या पातळीवर टीका केली. मी मात्र केव्हाही व्यक्तिगत पातळीवर टीका केली नाही. शिवसेना शेषनाग नसून कालिया नाग आहे अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीये. तसंच मला किमान गाव तरी आहे. उद्धव ठाकरेंचे गाव कोणते? ते शिवसेनेने जाहीर करावे. उद्धव ठाकरे मुळचे महाराष्ट्रातील तरी आहेत का? अशी विचारणाही त्यांनी केली .

शिवसेनेच्या मुखपत्राने गांडुळाची उपमा देण्यासंदर्भात विखे पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले. शिवसेनेचा जनाधार आता संपला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच त्यांना माफीनामा जाहीर करावा लागला. हे उशिरा सुचलेले शहाणपण असले तरी दुखावलेले शिवसैनिक दसरा मेळाव्याकडे पाठ फिरवतील, या भीतीने उद्धव ठाकरे यांनी माता भगिनींची माफी मागितली, पण मराठा समाजाची त्यांनी माफी मागितलेली नाही. माफी मागणार नाही, अशी वल्गना करणाऱ्यांना पक्षातील आक्रोशाला सामोरे जावे लागले. राज्यात फिरणेही मुश्किल होईल, हे लक्षात आल्यानंतर त्यांची भूमिका बदली असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले.

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पुरानं थैमान घातले आहे अशा परिस्थितीत सरकारनं त्वरीत अन्नछत्र सुरू करावं. शेतीचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतक•यांना त्वरीत अर्थिक मदत करावी आणि त्याचबरोबर कर्जमाफी करावी अशी मागणीही विखे पाटलांनी केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा