औरंगाबादेत आठ वर्षांनंतर मंत्रिमंडळाची बैठक,12 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा ?

October 4, 2016 8:51 AM1 commentViews:

fadanvis_mantralayaऔरंगाबाद, 04 ऑक्टोबर : मराठवाड्यासाठी आज 12 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. आज औरंगाबादमध्ये तब्बल आठ वर्षांनंतर मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत ही घोषणा होते का याकडे संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागलंय.

सभेदारी विश्रामगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल 21 मोर्चे निघणार आहे. या मोर्चांना आमखास मैदानावर अ़डवले जाणार आहे. तर जवळपास 450 शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याच्या तयारी आहे.सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार आहे.

‘ओला दुष्काळ जाहीर करा’

धनगर समाजाच्या मोर्चासह , काँग्रेसचाही मोठा मोर्चा असणार आहे. ओला दुष्काळ जाहीर करा प्रमुख मागणी मोर्चा असणार आहे. या मोर्चांमुळे मंत्र्यांच्या संरक्षणासाठी तीन हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आलाय.. तर या बैठकीत प्रत्येक विभागाच्या दोन मोठ्या आणि दोन नव्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र याच बैठकीत मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या मदतीची घोषणाही सरकारने करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलीये. या बैठकीत मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतला जाण्याचीही शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Vinit Gavankar

    विराट मोर्चा काढा , मराठी आरक्षण करा . पण पहिले सिंचन घोटाळा फास्ट ट्रॅक मध्ये चालावा आणि as per किरीट सोमय्या यांचा आरोपानुसार दादा आणि तटकरे यांची चौकशी सुरु करा . 70 हजार कोटींचा घोटाळा दाबायला हे मोर्चे सुरु केलेत हे आता सगळ्या लोकांना कळायला लागलाय . कारण लोक पण आता IIM , IIT ,BE आणि उंच शिक्षित आहेत . हे सगळे साहेबांचे डाव पेच आहेत to make pressure on the gov .