ना’पाक’ हल्ले सुरूच, सीमेलगतच्या गावांवर गोळीबार

October 4, 2016 9:05 AM0 commentsViews:

jamu_kashmir_fireकाश्मीर, 04 ऑक्टोबर : पाकिस्तानची आगळीक सुरूच आहे. पाकने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. सीमेलगतच्या गावांवर तुफान गोळीबार आणि बॉम्बफेक केलीये. या हल्ल्यात 5 जण जखमी झाले आहे.

काश्मीरमधील पुंछ भागात सोमवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानच्या वतीने शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यावेळी पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर आणि गावांवर तुफान गोळीबार करण्यात आला. पुंछ जिल्ह्यामधील शाहपूर, कृष्णगती, मंडी या भागामध्ये गोळीबार करण्यात आला. याशिवाय बॉम्बगोळेही फेकण्यात आले. यावेळी फेकण्यात आलेल्या एका बॉम्बमुळे 5 जण किरकोळरित्या जखमी झाले. भारतानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. भारताने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानमधील एक चौकी जळून खाक झाल्याची माहिती समोर आलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा