बीडमध्ये पावसाचा कहर, शहराला पुन्हा पुराचा धोका

October 4, 2016 11:43 AM0 commentsViews:

beed_rain43423बीड, 04 ऑक्टोबर : दुष्काळाने होरपळून निघालेल्या बीड जिल्ह्याला परतीच्या पावसानेच चांगलेच झोडपून काढले आहे. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे 60 टक्क्यांहून अधिक भाग पाण्याखाली गेलाय. नद्या नाल्यांना पूर आलाय. शहराला पुराचा वेढा पडलाय.

बीडमध्ये कालरात्री मुसळधार पाऊस झाला. प्रामुख्याने धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे धरणात पाण्याच्या पातळीत वाढ झाली.शहरातही अनेक भागांमध्ये पाणी शिरलं. बीडमधल्या मोठ्या मोठ्या पुलाला मध्यरात्री दीडच्या सुमारास पाणी लागलं. या भागातले नागरिक रात्रभर पाण्याच्या भीतीने जागे होते. महिला आणि लहान मुलांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते.

पाटोदा तालुक्यातील दासखेड इथल्या तलावात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे डोकेवाडा प्रकल्प पुन्हा ओसंडून वाहात होता. यामुळे बिंदूसरा धरणात रात्रीच पाणी पातळीत मोठ्यान वाढ झाली. तसंच पेठ बीड भागात पोलीस रात्रभर पुलावर पहारा देत होते. या भागात पुलावरून जाणारी वाहतूक देखील बंद करण्यात आली होती. नदीच्या पाणात झपाट्यानं वाढतं जाणारं पाणी लक्षात घेत बार्शी नाक्याचा पुल सुद्धा वाहतुकीसाठी बंद ठेवला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा