पाईपफुटीवर कारवाई सुरू

April 21, 2010 2:26 PM0 commentsViews: 1

21 एप्रिल

माटुंगा आणि सांताक्रूझ इथे 31 जानेवारी दरम्यान फुटलेल्या पाईपलाईनबाबत संबंधितांवर कारवाई सुरू आहे.

तसेच सांताक्रूझ येथील पाईपलाईन एमएमआरडीएच्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे फुटली. त्यामुळे कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याच्याकडून चार लाख 30 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी विधानपरिषदेत दिली.

मुंबईत इतर ठिकाणी पाईपलाइन फुटण्याचे प्रकार झाले. त्याबाबतही सुमारे एक कोटींची नुकसान भरपाई वसूल केली जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

close