शिवाजी पार्कचा मुद्दा विधानसभेत

April 21, 2010 2:32 PM0 commentsViews: 1

21 एप्रिल

शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला.

शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणासंदर्भात एक संयुक्त बैठक आयुक्तांनी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीत सुशोभीकरणाच्या विषयावरुन सुरू असलेला वाद सविस्तर चर्चा करून सोडवावा, असे निर्देश आयुक्तांना दिल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबतच्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

सात कोटीचे हे काम कोणतीही निविदा न मागवता कसे दिले गेले असा मुद्दा अस्लम शेख यांनी या लक्षवेधीद्वारे मांडला.

त्यावर स्थानिकांचा विरोध असतानाही हे काम महापालिका का रेटत आहे, यात कोणाचा इंटरेस्ट आहे?असा सवाल यावळी मनसेचे आमदार नितीन सरदेसाईना केला.

यावेळी शिवसेना आणि मनसेने एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

close