भारताचा मोठेपणा, चुकून भारत आलेल्या पाकिस्तानी मुलाला मायदेशी सोडले

October 4, 2016 1:41 PM0 commentsViews:

pak_boy_relif04 ऑक्टोबर : भारत आणि पाकिस्तानमधले तणावाचे संबंध निवळावेत यासाठी भारताने पहिलं पाऊल उचललं आहे. सीमारेषा चुकून ओलांडून भारतात आलेल्या 12 वर्षांच्या एका पाकिस्तानी मुलाला मायदेशी पाठवण्यात आलंय.

पाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यातील धारी गावाचा मोहम्मद तन्वीर हा 12 वर्षांचा मुलगा पाण्याच्या शोधात चुकून सीमारेषा ओलांडून भारतात आला. बीएसएफच्या जवानांनी रविवारी मोहम्मदला फिरोजपूर सेक्टरमधील दोना तेलूमल चौकीच्या परिसरात ताब्यात घेतलं होतं. हे जवान पंजाबमधील सीमेलगतच्या भागातील शेतीचं संरक्षण करत असतात. बीएसएफच्या जवानांनी मोठेपणा दाखवत या मुलाला आपल्या मायदेशी परत पाठवलं.

काही दिवसांपूर्वी धुळ्याचा जवान चंदू चव्हाण चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलाय. पाक सैनिकांनी त्याला ताब्यात घेतलंय. भारताच्या उदार भूमिकेमुळे पाकिस्तान आता चंदू चव्हाण यांची सुटका करणार का? असा प्रश्न विचारला जातोय. आतापर्यंत चव्हाणांची सुटका करायला पाकिस्तानने नकार दिला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा