जसलोकच्या सीईओंना समज

April 21, 2010 2:42 PM0 commentsViews: 1

21 एप्रिल

जसलोक हॉस्पिटलचे सीईओ मनेष मसंद यांना सभागृहाच्या अवमान प्रकरणी आज विधानपरिषदेत सभापती शिवाजीराव देशमुख यांनी समज दिली.

काही दिवसांपूर्वी जसलोक हॉस्पिटलच्या पाहणी दौर्‍यावर गेलेल्या लोकप्रतिनिधींना मसंद यांनी खरी माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली होती.

त्या विरोधात गेल्या आठवड्यात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.

त्यावर सभापतींनी मसंद यांना दोन्ही सभागृहांची माफी मागावी असे आदेश विधानपरिषदेत दिले.

त्यानुसार आज मसंद विधानपरिषदेत हजर झाले. त्यांना सभापतींनी यापुढे अशी चूक करू नये, अशी समज दिली.

close