चक्क ‘त्या’ला शेपटी, नाव पण मारुती !

October 4, 2016 2:48 PM0 commentsViews:

  04 ऑक्टोबर : मानवाच्या उत्क्रांतीच्या काळात त्याला शेपूट होती असं म्हटलं जातं. नंतर जसा मानव विकसित झाला त्याची शेपटी नाहीशी झाली. पण, आज या आधुनिक युगात एका तरुणाला शेपटी आहे…बसला ना धक्का…हो हे खरंय…नागपुरात एका तरुणाचा चक्क शेपटी आहे आणि त्याचं नावही मारुती ठेवण्यात आलंय.

नागपूरमध्ये एका तरुणाला चक्क जन्मजात शेपूट असल्याचं उघड झालंय. या 18 वर्षांच्या तरुणाला जन्मापासूनच शेपूट आहे. पण लाजेखातर या तरुणाने ही बाब आजवर कोणालाही सांगितली नव्हती. पण या शेपटाचा त्रास असह्य होऊ लागल्यानं त्यांने अखेर दवाखाना गाठला. या शेपटाची लांबी थोडीथोडकी नाही तर तब्बल 19-20 सेंटीमीटर लांब आहे.

लहानपनापासून या तरुणाला शेपूट असल्याने आई-वडीलांनीही त्याचं नाव मारुती असंच ठेवलं होतं. नागपूरच्या सुपर स्पेशालिटी रूग्णालयात मारूतीवर उपचार सुरू आसून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम हे शेपूट काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शेपटी कापल्यावर त्याच्यावर कोणतेही विपरित परिणाम होणार नाहीत असं डॉक्टरांचं मत आहे. तसंच अशा प्रकारची शेपटी असणे हा मानवी शरीराचा अपभ्रंश आहे, असं त्याच्यावर उपचार करणा•या डॉक्टरांचं मत आहे. बाळ गर्भात असताना फॉलिक ऍसिडचं सेवन कमी झालं तर असे प्रकार होऊ शकतात असं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा