‘धोनी’ची बॉक्स ऑफिसवर तुफान बॅटिंग, ‘सेंच्युरी’कडे वाटचाल

October 4, 2016 2:51 PM0 commentsViews:

mahendra singh dhoni untold story (3)04 ऑक्टोबर : आपल्याकडे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर सिनेमा आला की प्रेक्षकांना तो आवडतो.. ‘एम एस धोनी- द अन्टोल्ड स्टोरी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरतोय. भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या आयुष्यावरच्या या सिनेमाने पहिल्या विकेन्डला तब्बल 74.51 कोटींची कमाई केलीये.

सुशांत सिंग राजपुतची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा या वर्षी ‘सुलतान’नंतर सर्वाधिक ओपनिंग विकेन्डच्या कमाईत दुस•या क्रमांकावर आहे. शुक्रवारपासून या सिनेमाची घोडदौड सुरू आहे. शुक्रवारी सिनेमाचं कलेक्शन 21.30 कोटी रुपये झालं, तर शनिवारी 20.60 कोटी रुपये आणि रविवारी 24.10 कोटी रुपये ओपनिंग झालं. विकेन्डला प्रचंड कमाई करणा•या या सिनेमानं सोमवारी 8.51 कोटी रुपये कमावले. आता लवकरच एमएस धोनी 100 कोटींच्या क्लबमध्ये येणार असं दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा