सर्जिकल स्ट्राईक बनावट, निरुपम यांचा सरकारवर हल्लाबोल

October 4, 2016 3:28 PM4 commentsViews:

sanajy_nirupam04 ऑक्टोबर : भारताने राजकीय फायद्यासाठी सर्जिकल स्ट्राईकची अफवा पसरवली आहे. सर्जिकल स्ट्राईक बनावट आहे असा गंभीर आरोप मुंबई शहर काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय.

गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराने पाकव्यापत भागात घुसून सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. या कारवाईत 38 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या सर्जिकल स्ट्राईकवर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर हल्लाबोल केलाय. सर्जिकल स्ट्राईकही बनावट होती. राजकीय फायद्यासाठी भाजपने सर्जिकल स्ट्राईकची अफवा पसरवली आहे. सर्जिकल स्ट्राईकचे सरकारने पुरावे द्यावेत अशी मागणी निरुपम यांनी केलीये. तसंच जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत ही सर्जिकल स्ट्राईक फेक आहे असंही संजय निरूपम म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


 • Prashant Nikam

  Why you are entertaining to PAK media, Do you have faith on Indian Army?

 • Sham Dhumal

  देशाच्या शत्रूशी कसे संबंध ठेवायचे, कोणती नीती/ धोरणे राबवायची हे केंद्र सरकारचे काम आहे. अशावेळी सर्व नेत्यांनी व जनतेने सरकारच्या सोबत असायला हवे. अशावेळी सरकारला विरोध करत शंका कुशंका काढणे म्हणजेच शत्रूला मदत करण्यासारखेच आहे.

 • Sham Dhumal

  अचानक मिळालेली सत्ता किंवा संपत्ती यांचा कांही लोकांच्या मेंदूवर नक्कीच परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या जिभेवर त्यांचं नियंत्रण रहात नाही.

 • Sham Dhumal

  गलिच्छ राजकारण करण्यात कांही नेते किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.