मंत्रिमंडळ बैठकीत घोषणांचा पाऊस !

October 4, 2016 6:09 PM0 commentsViews:

cm_Abad432404 आॅक्टोबर : औरंगाबादमध्ये आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणांचा पाऊस पडलाय. सिंचन प्रकल्प, रस्त्यांचं बांधकाम यासाठी भरीव मदत सरकार देणार आहे. मराठवाड्यात गेल्या 4 दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. अतिवृष्टीमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनाही मदत मिळणार आहे. सरकारने मराठवाड्यासाठी ही भरीव मदत दिली असली तरी ही मदत म्हणजे पॅकेज नव्हे हेही सरकारने स्पष्ट केलंय.

मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

- 4 हजार 500 किमीचे रस्ते पूर्ण करणार
– रस्त्यांच्या बांधकामासाठी 49 हजार 288 कोटींचा निधी
– रस्त्यांचं काम 3 वर्षांत पूर्ण करणार
– मराठावाड्यातले सिंचन प्रकल्प पूर्ण करणार
– सिंचन प्रकल्पासाठी 4 हजार 800 रु. निधी
– अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 4 लाख रु.
– जनावरांच्या मृत्यूची नुकसान भरपाई देणार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा