ऊर्जित पटेलांकडून दिवाळी भेट, गृह आणि वाहन कर्ज होणार स्वस्त

October 4, 2016 9:41 PM0 commentsViews:

home_And_Car_loan04 ऑक्टोबर : रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी देशवासियांना दिवाळीची भेट दिलीय. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी कपात केलीय. रिझर्व्ह बँकेने आज नवं पतधोरण जारी केलंय. त्यानुसार, रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून रेपो रेट 6.25 टक्क्यांवर आणलाय. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त होऊ शकतं. त्यासोबत वाहन कर्जही स्वस्त होऊ शकतं.

पण असं असलं तरी महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. सातव्या वेतन आयोगामुळे घरांच्या भाड्यामध्ये वाढ होऊ शकते, असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्यामुळे महागाईची झळ अजूनही जाणवतेय. पण जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत महागाई नियंत्रणात येईल, असं ऊर्जित पटेल यांनी म्हटलंय.

होमलोन कसं होणार स्वस्त ?

आधी
20 वर्षांसाठी 20 लाख रुपयांचं कर्ज
आधी 9.50 % व्याज
18 हजार 643 रु. हप्ता

आता
20 वर्षांसाठी 20 लाख रुपयांचं कर्ज
आता 9.25 % व्याज
18 हजार 317 रु. हप्ता
 
वर्षाकाठी 3 हजार 912 रुपयांची बचत

कारलोन कसं होणार स्वस्त ?

आधी

5 वर्षांसाठी 5 लाख रु. कार लोन
आधी 10.25 % व्याज
21 हजार 371 रु. हप्ता

आता
 5 वर्षांसाठी 5 लाख रु. कार लोन
आता 10 % व्याज
21 हजार 248 रु. हप्ता

वर्षाकाठी 1 हजार 476 रुपयांची बचत
 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा