वडाळ्यात बुध्दिस्ट फेस्टिव्हल

April 21, 2010 5:58 PM0 commentsViews: 25

21 एप्रिल

मुंबईतील वडाळा भागात बुध्दिस्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. धम्मचक्र अनुप्रवर्तक दिन महोत्सव समितीच्या वतीने या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

या फेस्टिव्हलमध्ये लोकजनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान, मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग या नेत्यांची मुलाखत घेण्यात आली. हिंदी भाषा आणि भारतीय संविधान हा या मुलाखतीचा विषय होता.

या फेस्टिव्हलमुळे बुध्दांची विचारसरणी लोकांपर्यत पोहोचण्यास मदत होईल, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज संसारे म्हणाले.

close