सजिर्कल स्ट्राईकचे पुरावे लष्कराने केंद्राकडे सोपवले

October 5, 2016 8:48 AM0 commentsViews:

BRKING940_201610050904_940x355

05 ऑक्टोबर :  भारताने सजिर्कल स्ट्राईक केला की नाही यावरून राजकारण सुरू झालं. पण भारतीय लष्कराने सजिर्कल स्ट्राईकचे पुरावे केंद्राकडे दिलेत. लष्कराने केंद्राला दिलेल्या पुराव्यांमध्ये सजिर्कल स्ट्राईकचा 90 मिनिटांचा व्हिडिओच आहे. गरज पडली तर हे पुरावे सार्वजनिक करायलाही लष्कराने ग्रीन सिग्नल दिलाय.

दिल्लीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्याआधी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक आहे. त्यात हे व्हिडिओ दाखवण्यात येणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सजिर्कल स्ट्राईकबद्दल प्रश्न विचारले जातायत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सजिर्कल स्ट्राईकचे पुरावे मागितले होते. त्यानंतर या घडामोडी घडल्यायत. या हल्ल्याचं रेकॉर्डिंग करण्याचा उद्देश राजकीय नाही तर रणनीतीसाठी होता, असंही सरकारने म्हटलंय.

दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानला प्रत्यक्षदर्शींनी तोंडघशी पाडलं आहे. 29 सप्टेंबरच्या पहाटे भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात खात्मा केलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह ट्रकमधून अज्ञातस्थळी नेऊन दफन केलं, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा