मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार 13 तारखेला सादर करणार प्रतिज्ञापत्र

October 5, 2016 12:38 PM4 commentsViews:

devendra-fadnavis66

05 ऑक्टोबर : मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आयोजित करण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक काहीवेळापूर्वीच संपली. या बैठकीनंतर राज्य सरकारने येत्या 13 तारखेला हायकोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज (बुधवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. सरकार मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत सकारात्मक आणि गंभीर आहे.

आजच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिक्षणमंत्री विनोद तावडे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, शिवसेना आमदार एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मराठा आरक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीकडे राजकीय वर्तुळासह अनेकांचे लक्ष लागले होते. कोपर्डी घटनेनंतर मराठा समाजाकडून राज्यभरात विविध ठिकाणी मूक क्रांती मोर्चे काढण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा सरकारवरील दबाव वाढला आहे.

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


 • Sham Dhumal

  मराठा क्रांती मोर्चे शांतपणे सुरळीत पार पडत आहेत तर हे अनेकांना खुपत आहे, अनेकांना पोटशूल झालेला दिसतोय. कांही विघ्नसंतोषी लोकांना समाजातील शांतता बघवत नाही.

 • Sham Dhumal

  मराठ्यांच्या मागण्या निवेदनाद्वारे दिलेल्या आहेत. सरकार त्यावर निर्णय का घेत नाही? नेत्यांची वाट बघून राजकीय रंग द्यायचा आहे का? अनेक त्रुटी ठेऊन जाहीर केलेलं १६ % आरक्षण निव्वळ फसवणूक आहे.

 • Sham Dhumal

  मराठा मोर्चा कोणत्याही जातीच्या, धर्माच्या, व्यक्तीच्या विरोधात नाही तरीसुध्दा कांही राजकीय नेते नेहमीच्या सवईप्रमाणे सोईस्कर अर्थ लावत आहेत.

 • Sham Dhumal

  अ‍ॅट्रॉसिटिचा उपयोग शस्त्र म्हणून केला जातोय इतरांना त्रास देण्यासाठी, ब्लॅकमेल करण्यासाठी, बदला घेण्यासाठी. यासाठी हा कायदा रद्द करणे/बदल करणे तसेच ह्या कायद्याचा दुरुपयोग करतात त्यांना कडक शासन करण्याचा बदल करणे आवश्यक आहे.