सलमान पाठोपाठ राधिकाही पाकिस्तानी कलाकारांच्या बाजूनं

October 5, 2016 11:07 AM1 commentViews:

Radhika aapte123

05 ऑक्टोबर : उरी हल्ल्याच्या नंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करावं की नाही या चर्चेत राधिका आपटेनं उडी मारली आहे. पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालणं अयोग्य असल्याचं सांगत राधिका आपटेने पाकिस्तानी कलाकरांची बाजू घेतली आहे.

कुणाला देशात येण्यापासून आपण कसं थांबवू शकतो असा सवाल तीने केलाय. शेजारचा देश तसा वागतो म्हणून आपणही तसंच वागणं चुकिचं असल्याचं तिने म्हटलं आहे. गांधीजींनी शिकवलेल्या तत्त्वांना आपण स्वतःच हरताळ फासत असल्याचं मत तिने व्यक्त केलं आहे.

स्वॉच घडाळ्यांच्या लाँचच्या वेळी राधिका आपटे म्हणाली की स्वीस घडाळ्याची कंपनी भारतात येऊ शकते. इथे येऊन दुकान उघडू शकते, तर मग पाकिस्तानी कलाकार भारतात का येऊ शकत नाहीत? त्यांनी इथे येऊन काम करायला हवं.

राधिका नुकतीच रिलीज झालेल्या पार्च्ड सिनेमातल्या तिच्या अभिनयामुळे चर्चेत आहे.

उरी हल्ल्यानंतर मनसेनं रईस सिनेमातली महिरा खान आणि ऐ दिल है मुश्किलमधल्या फवाद खानला भारत सोडायला सांगितलं. याशिवाय पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालायची की नाही यावर जोरदार चर्चा सुरू आहे. पण बॉलिवूडमध्ये याबद्दल दोन वेगवेगळी मतं असणारी गट आहेत. त्यात आता राधिका आपटेचीही भर पडली आहे.

.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Rambo Rajkumar

    So Irresponsible miss apte shame on you