सुप्रसिद्ध संगीतकार अरूण दाते यांचा मुलगा संगीत दाते यांचं निधन

October 5, 2016 2:03 PM0 commentsViews:

sangeet Date Bann123

05 ऑक्टोबर : मराठीतील ज्येष्ठ संगीतकार अरुण दाते यांचा मुलगा संगीत दातेंचं आज (बुधवारी) निधन झालं आहे. मुंबईतील सायन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मराठी संगीतसृष्टीला भावगीतांनी समृद्ध केलेल्या अरुण दातेंचा मुलगा संगीत काही दिवसांपूर्वी अवस्थेत सापडले होते. ते पुण्यातील वाकड पुलाखाली भिकार्‍याचे जिणं जगत होते. जेव्हा IBN लोकमतने त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला, तेव्हा आमचा संगीतशी काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

संगीत दाते यांच्या निधनाबाबत कळवण्यासाठी नातेवाईकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, परंतु कोणीही उत्तर देत नाहीयेत, असं त्यांच्या मित्रांकडून समजतंय. त्यामुळे संगीत यांची बालमैत्रीण, जॉय नागेश भोसले आणि मित्रमंडळी आज दुपारी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा