भारतात होणाऱ्या कबड्डी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला नो एंट्री

October 5, 2016 5:10 PM0 commentsViews:

pak_kabadi05 ऑक्टोबर : भारतात या आठवड्यात होणाऱ्या कबड्डी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानवर बंदी घालण्यात आलीय. भारत पाकिस्तानमध्ये संबंध ताणले गेले आहे ते पाहता पाकला खेळू देऊ नये असं आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनने स्पष्ट केलंय.

उरीच्या हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सजिर्कल स्ट्राईक केला. त्यानंतरही पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर हल्ले सुरूच ठेवलेत. या घटनांमुळे भारत – पाकिस्तान संबंधात तणाव निर्माण झालाय. त्यामुळे पाकिस्तानच्या टीमला कबड्डी वर्ल्ड कपमध्ये खेळू देणं योग्य होणार नाही, असं आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनने म्हटलंय. अहमदाबादमध्ये येत्या शुक्रवारपासून म्हणजे 7 ऑक्टोबरपासून कबड्डी वर्ल्ड कप सुरू होतोय. यामध्ये इराण, ऑस्ट्रेलिया, द.कोरिया, इंग्लंड, पोलंड, केनिया, अर्जेंटिना आणि अमेरिकेच्या टीम सहभागी होतायत. पाकिस्तानशिवाय कबड्डी वर्ल्ड कप म्हणजे ब्राझील शिवायचा फूटबॉल वर्ल्ड कप, अशा शब्दांत पाकिस्तानच्या कबड्डी क्षेत्रातल्या अधिका•यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा