हा घ्या सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा !

October 5, 2016 9:03 PM0 commentsViews:

surgical strike banner05 ऑक्टोबर : पाकिस्तानने भारताच्या सर्जिकल स्ट्राईकचा इन्कार केला असला तरी त्याचे एकाहून एक पुरावे मिळतायत. या हल्ल्यात 12 अतिरेकी ठार झाल्याची माहिती पाकिस्तानच्या पोलीस अधिकाऱ्यांनीच दिलीय. तसंच या मृत अतिरेक्यांचे मृतदेह पाक सैनिकांनीच पुरले असा खुलासाही या अधिकाऱ्यांने केला.

उरी हल्लानंतर भारताने दहशतवादाविरोधात कडक पाऊलं उचलली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केलं. या कारवाईत 38 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. भारताच्या या कारवाईचं पाकचे चांगलेच धाबे दणाणले. अशी कोणतीही सर्जिकल स्ट्राईक झाली असा खोटा प्रचारच पाकने सुरू केला. आता मात्र पाकिस्तानच्या एका पोलीस अधिकाऱ्यांने पाकला घरचा अहेर दिलाय.

पाकव्याप्त काश्मीरमधल्या मिरपूरच्या पोलीस अधीक्षक गुलाम अकबर यांच्याशी न्यूज 18 ने फोनवरून बातचीत केली. त्यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईक झाल्याचं मान्य केलं. या कारवाईत 12 अतिरेकी मारले गेले आणि मृतदेह पाक सैनिकांनी दफन केले असा खुलासाही अकबर यांनी केला. यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झालाय. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला केला ते अतिरेक्यांचे तळ होते, हेही या पोलीस अधिकाऱ्यांने मान्य केलंय.

दरम्यान, आजच पाकव्याप्त काश्मीरमधल्या सजिर्कल स्ट्राईकचे पुरावे भारतीय लष्कराने आज सरकारकडे सोपवले. सर्जिकल स्ट्राईकचा हा 90 मिनिटांचा व्हिडिओ आहे. आणि आता पाक अधिकाऱ्यांनेच दुजोरा दिल्यामुळे पाकचा बुरखा टराटरा फाटलाय.

कसा झाला सजिर्कल ऍटॅक ?

28 सप्टेंबर 2016
ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर्सनी पॅराकमांडोच्या 5 टीम्सना रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरवलं.

29 सप्टेंबर – पहाटे 2 वा.
अंधाराचा फायदा घेऊन पॅराकमांडोंनी स्फोटकं, रॉकेट लाँचर्स आणि ग्रेनेड्ससह लाँचपॅड्स सज्ज केले.

या कमांडोंना संरक्षण देण्यासाठी भारताने नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू केला.

पॅराकमांडोंनी दहशतवाद्यांच्या 7 तळांवर हल्ला चढवला आणि 50 अतिरेक्यांना ठार केलं

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भिंबर, हॉट स्प्रिंग, केल, लिपा याठिकाणी हे सजिर्कल स्ट्राईक्स झाले.

पहाटे 4.30 ते सकाळी 8 वा.

पॅराकमांडो हल्ल्याच्या ठिकाणाहून नियंत्रण रेषेच्या अलीकडे आले.
यात 2 जवान जखमी झाले पण बाकीचे सगळे जवान सुरक्षित परत आले.

सकाळी 10 वा.
भारताच्या DGMO नी पाकिस्तानच्या DGMO ना फोन करून हल्ल्याची माहिती दिली.

भारतीय लष्कराने पाकिस्तानला नव्हे तर दहशतवाद्यांना लक्ष्य केलं हे त्यांनी सांगितलं.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सजिर्कल ऍटॅकची माहिती जनतेला देण्याचा निर्णय घेतला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा