काश्मीरवर तोडग्याशिवाय शांतता नांदणार नाही -नवाझ शरीफ

October 5, 2016 9:12 PM0 commentsViews:

nawaz sharif05 ऑक्टोबर : पाकिस्तानला भारतासोबत युद्ध नकोय पण काश्मीर प्रश्नावर तोडगा निघाल्याशिवाय आशियामध्ये शांतता नांदणार नाही, असं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटलंय. पाकिस्तानच्या संसदेला उद्देशून आज नवाझ शरीफ यांनी भाषण केलं. त्यात त्यांनी हे वक्तव्य केलंय.

संयुक्त राष्ट्र आणि जागतिक पातळीवरच्या नेत्यांशी आपण काश्मीर प्रश्न सोडवण्याबद्दल बोललो आहे, अशीही पुष्टी शरीफ यांनी जोडली. काश्मीरमधल्या जनतेचा स्वयंनिर्णयासाठीचा लढा भारत दडपू शकत नाही, असं सांगतानाच नवाझ शरीफ यांनी हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बु•हाण वणीचा उल्लेख केला. शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही बु•हाण वाणीचा उल्लेख केला होता. हे मानवाधिकारांचं उल्लंघन आहे, असं शरीफ म्हणाले होते.

पाकिस्तान चर्चेसाठी तयार आहे पण भारत मात्र ही चर्चा होऊ देत नाहीये, अशी उलटी बतावणी शरीफ यांनी केली. उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालाय. अमेरिका आणि ब्रिटन या दोन्ही देशांनी पाकिस्तानला या हल्ल्याचा निषेध करायला सांगितलंय. पण हे न करता शरीफ यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी आणि ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनाच प्रश्न विचारले. काश्मीरमधल्या अशांततेबद्दल दोन्ही देशांनी मौन का बाळगलंय, असा उलटा सवाल त्यांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा