नवरात्र…उत्सव रानफुलांचा !

October 5, 2016 11:50 PM0 commentsViews:

रायचंद शिंदे, जुन्नर, 5 ऑक्टोबर: नवरात्र आणि रानफुलांचं एक वेगळं नातं आहे. या नऊ दिवसांत घराघरातल्या देवीच्या घटांवर आणि मंदिरात देवीला या रानफुलांचा हार करून घातला जातो. पण हाच निसर्ग नवरात्रीसाठी देवीसमोर फुलांची उधळण करतो. नैसर्गिक रानफुलांच्या पायघड्या पहायच्या असतील तर तुम्हाला या दिवसात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जावं लागेल. जुन्नरच्या घाटमाथ्यावर वरसुबाई आणि दुर्गादेवीचा परिसर याच रानफुलांनी बहरलाय.junnar4

आंबेहातविज…सह्याद्रीच्या डोंगर रांगातला जुन्नर परिसरातला मोकळ्या पठारांचा आणि रानफुलांचा खजिना असलेला प्रदेश…इथं वसल्या आहेत, दुर्गादेवी आणि वरसुबाई…या दोन्ही देवी आदिवासींची श्रद्धास्थानं मानली जातात.इथं जाण्यासाठीचा रस्ता अगदी ओबडधोबड आणि अवघड…पण या अनवट वाटेनंही भाविक इथपर्यंत पोहोचतातच आणि निसर्गमित्रही.
रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारासारखीच रानफुलं इथं दिसतात.माळरानावर पखरण झालेली सोनकी आणि कुमुदिनी…

पाऊसपाणी चांगलं झालं तर इथला निसर्ग अवर्णनीय असा बहरतो.ऑगस्ट ते डिसेंबर काळात निसर्ग असा बहरून येतो. दुर्गादेवी, वरसुबाईचं दर्शन घेण्यासाठी तर भाविक नवरात्रात इथं येतातच.पण हा जादूमयी निसर्ग अनुभवण्यासाठी आता इथं माणसांची गर्दी वाढतेय..त्यामुळेच या अनवट सौंदर्याला गालबोट लागेल की काय अशी भीतीही वाटतेय.
निसर्गाचं हे सौंदर्य निसर्गप्रेमींना असंच अनुभवता येऊ दे..निसर्गाचं जतन हाच देवीचा जागर हे आपण लक्षात ठेवू या..!!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा