काश्मीरमध्ये लष्काराच्या कॅम्पवर हल्ला, 3 अतिरेक्यांचा खात्मा

October 6, 2016 12:38 PM0 commentsViews:

loc firing406 ऑक्टोबर : सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईनंतरही पाकिस्तानच्या कुरापत्या सुरू आहे. काश्मीरमधल्या हंदवाडा इथे 30 राष्ट्रीय रायफल्सच्या मुख्यालयावर आज पहाटे अतिरेक्यांनी हल्ला चढवला. उरी, आणि बारामुल्लानंतर भारताच्या सशस्त्र दलांवर अलीकडे झालेला हा तिसरा दहशतवादी हल्ला. हंदवाडामध्येही भारतीय लष्कराने अतिरेक्यांना चोख प्रत्त्युत्तर देत तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. यातला एक अतिरेकी पळून जात असताना कोंबिंग ऑपरेशन करत भारतीय जवानांनी त्याला ठार केलं.

हंदवाडातील 30 राष्ट्रीय रायफल्सच्या लष्करी मुख्यालयावर पहाटे 5.30 वाजता अतिरेक्यांनी गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर हे अतिरेकी आसपासच्या गावात लपून बसले होते. भारतीय जवानांनी त्यांचा माग घेत त्यांचा खात्मा केला. या तिन्ही अतिरेक्यांचे मृतदेह सापडले आहे. ही चकमक आता संपली असून या अतिरेक्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला आहे. ही शस्त्रं पाकिस्तानी बनावटीची आहेत. याशिवाय या अतिरेक्यांकडे भारतीय चलन, मोबाईल, सॅटेलाईट फोन नकाशे, मेडिकल किट्स, तसंच खाद्यपदार्थ सुद्धा सापडलेत.

पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक पाकविरोधात रस्त्यावर

दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक दहशतवाद्यांविरोधात निदर्शनं करतायेत पण तरीही दहशतवाद्यांना पोसण्याचं पाकिस्तान काही थांबवत नाहीये. आज पहाटे 30 राष्ट्रीय रायफल्सच्या कुपवाडामधल्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला. असे अनेक हल्ले झाले तरी हा हल्ला करणारे दहशतवादी नसल्याचे पाकचे खोटे दावे चालूच राहतील. आता पाकव्याप्त काश्मीरमधले नागरिकही पाकिस्तानच्या दुतोंडी वागण्यावर भडकलेत. त्यांच्या गावांजवळचे दहशतवादी तळ बंद करावेत या मागणीसाठी ते आता रस्त्यावर उतरलेत. या दहशतवाद्यांमुळे त्यांचे हाल होत असल्याचं सांगत पाकव्याप्त काश्मीरच्या ब•याच भागातले नागरिक पाकिस्तान सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शनं करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा