भगवानगडाला जातीय रंग नको, पंकजांच्या भाषणाला नामदेवशास्त्रींचा विरोध

October 6, 2016 12:56 PM0 commentsViews:

namdev_shashtri06 ऑक्टोबर : भगवान गड हा काही एका जातीचा नाही, तिथल्या दसरा मेळाव्याला जातीय रंग देऊ नये अशी भूमिका भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतलीये. ते आयबीएन लोकमतशी बोलत होते.

महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यासाठी भगवानगडावर येण्याचं आवाहन सगळ्यांना केलंय. तशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकलीय. त्यावर उत्तर देताना नामदेवशास्त्रींनी पंकजाच्या राजकीय भाषणाला विरोध केलाय. गडावर फक्त महंतांचच भाषण होईल कुठलंही राजकीय भाषण होणार नाही याचा पुनर्रउच्चारही नामदेवशास्त्रींनी केलाय. तर दुसरीकडे नामदेवशास्त्रींना वंजारी समाजातून विरोध वाढतोय. भगवानगडाच्या आसपासच्या जवळपास तीनशे ग्रामपंचायतींनी पंकजा मुंडेंना पाठिंबा दर्शवत त्यांच्या भाषणाचा आग्रह धरलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा