नाशिकमध्ये पुन्हा बाईक जाळल्या

April 22, 2010 10:32 AM0 commentsViews: 3

22 एप्रिल

नाशिकमध्ये गुंडांचा हैदोस पुन्हा सुरू झाला आहे. सिडकोमधील अवनी या बिल्डिंगमध्ये मध्यरात्री काही गुंडांनी गाड्या जाळण्याचा प्रताप केला.

बिल्डिंगमध्ये पार्क केलेल्या गाड्याच या गुंडांनी पेटवून दिल्या.

या आगीच्या भडक्याने बिल्डिंगमधील इलेक्ट्रीक मीटर्स आणि वायर्सही जळाल्या.

ही आग पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचली होती.

कहर म्हणजे गुंडांनी गाड्या पेटवण्यापू्र्‌वी बिल्डिंगमधील फ्लॅट्सना बाहेरून कड्या लावल्या होत्या.

close