ओम पुरींकडून पद्मश्री पुरस्कार परत घ्या, मनसेची मागणी

October 6, 2016 1:22 PM1 commentViews:

mns_Vs_puri6 ऑक्टोबर : ‘सैन्यात जायला कुणी सांगितलं’ असं असंवेदशिल वक्तव्य करणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी आता मनसेच्या रडारवर आले आहे. शहीद जवानांचा अपमान करणाऱ्या ओम पुरींकडून सर्वच  राष्ट्रीय पुरस्कारांसह पद्मश्री पुरस्कारही परत घ्या अशी मागणी मनसेनं केलीये.

आयबीएन सेव्हनच्या ‘हम तो पुछेंगे’ या कार्यक्रमात अभिनेते ओम पुरी यांनी भारतीय शहीद जवानांबद्दल अपमान करणारं वक्तव्य केलं होतं. सैन्यात कुणी जायला सांगितलं असं ओम पुरी म्हणाले होते. त्याच्या या बेताल वक्तव्याचे देशभरात पडसाद उमटले. एवढंच नाहीतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाली. अखेर आपलं वक्तव्य मागे घेत त्यांनी माफी मागितली. आता ओम पुरींचे राष्ट्रीय पुरस्कार परत घ्यावेत अशी मागणी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलीय. ओम पुरी यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कारही परत घेण्याची मागणीही मनसेनं केलीय. 1990 मध्ये ओम पुरी यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. त्याआधी 1982मध्ये ‘आरोहण’साठी आणि 1984मध्ये ‘अर्धसत्य’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार ओम पुरींना दिला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Sandip Bhoi

    बुड्ढ़ा सठिया गया है |