मराठवाड्यातील सर्व तर मुंबईत विना अनुदानित शाळा बंद

October 6, 2016 2:22 PM0 commentsViews:

उस्मानाबाद, 06 ऑक्टोबर : विना अनुदानित शिक्षक संघटनानी पुकारलेल्या शाळा बंदला मराठवाड्यासह राज्यभर चांगला प्रतिसाद मिळतोय. बीड,उस्मानाबाद, परभणी आणि लातूरमध्ये शाळा बंद आहेत. तर मुंबईत मात्र संमिश्र प्रतिसाद मिळतोय. मुंबईतील फक्त विना अनुदानित शाळा बंद आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील जवळपास 220 विनाअनुदानित शाळा बंद आहेत.

school bandऔरंगाबादमध्ये मोर्चे काढणा•या शिक्षकांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्यानं शिक्षक संघटना आक्रमक झालीये. या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्य मुख्याध्यापक महामंडळाने आज शाळा बंदची हाक दिलीये.राज्यातील 25 हजार शाळा या बंदमध्ये सहभागी झाल्या आहे. या शैक्षणिक बंदला मुख्याध्यापक संघ, संस्थाचालक, विविध शिक्षक संघनांनी पाठिंबा दिला आहे. मुंबईतील शाळांचा बंदला पाठिंबा असला तरी मुंबईतील शाळा बंदमध्ये सहभागी होणार नाहीय. तर दुसरीकडे राज्यातील शिक्षकवर्गात संतापाची लाट पसरली असून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या मुख्याध्यापक महामंडळाची पुण्यात बैठक होणार आहे.

उस्मानाबाद जिल्यात अनुदानित आणि विना अनुदानित 582 शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. या मध्ये 432 माध्यमिक आणि150 प्राथमिक शाळा समावेश आहे.तर परभणीतही बंदला चांगला प्रतिसाद मिळालाय. या बंदमध्ये जवळपास 1300 माध्यमिक, प्राथमिक, आणि ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी सहभाग घेतला.
तर लातूरमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळालाय. दिवसभर शाळा बंद ठेऊन दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये अशी शिक्षकांची महत्त्वाची मागणी आहे.

तर लातूर शहरातल्या जवळपास सर्वच शाळा आज बंद करण्यात आल्या आहेत. तर जिल्हाभरातील देखील शंभर टक्के शाळा बंद करण्यात आल्याचं शिक्षक समितीच्या वतीनं सांगण्यात आलंय. शिक्षकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, तसंच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावं अन्यथा येत्या काळात बेमुदत शाळा बंद करून परीक्षांवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा