दसऱ्याच्या मुहूर्तावर लुटा सोनं !

October 6, 2016 2:30 PM0 commentsViews:

gold rate06 ऑक्टोबर : दसऱ्याच्या मुहूर्तावर जर सोने खरेदीचा बेत असले तर नक्कीच फायद्याचं ठरणार आहे. कारण, सोन्याच्या किमतींमध्ये जवळपास 750 रुपयांची घसरण झालीय. तर चांदीच्या दरातही किलोमागे 1785 रुपयांची घसरण झाली आहे.

नवी दिल्ली आणि मुंबईतील सराफ बाजारात सोन्याचा भाव 760 रुपयांनी कमी झाला. तो 30 हजार 100 रुपयांपर्यंत खाली आला आहे. प्रतिकिलो चांदीचा दर 43205 रुपयांपर्यंत खाली आलाय. चालू वर्षात सोन्यातील भावाची एका दिवसातील मोठी घसरण आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत सोनं, चांदी खरेदी करणा•यांना ही संधी साधून आलीय. नवी दिल्ली आणि मुंबईतील सराफ बाजारात सोन्याचा भाव 760 रुपयांनी कमी झाला. फेडरल रिझर्व्ह आणि युरोपीय केंद्रीय बँकेची व्याजदर वाढीची भीती आणि मागणी रोडावल्याने ही घसरण पाहायला मिळतेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा