पुण्यात ‘बर्निंग स्कूल व्हॅन’चा थरार

October 6, 2016 3:23 PM0 commentsViews:

pune_school4434पुणे, 06 ऑक्टोबर : पुण्यातील कोथरुडमध्ये द बर्निंग स्कूल व्हॅनचा थरार पाहायला मिळाला. शाळकरी मुलांना घेऊन जाणा•ऱ्या स्कूल व्हॅनला अचानक आग लागली. या व्हॅनमध्ये दहा मुलं होती. आग लागलेली दिसताच परिसरातल्या लोकांनी धाव घेत आग विझवली. ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

कोथरुड परिसरातील पटवर्धन परिसरात सकाळी 10 च्या सुमारास एका स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला. या व्हॅनमधून 10 मुलांना शाळेत सोडण्यात येणार होतं. या व्हॅनला आग लागली हे लक्षात येताच ड्रायव्हरने सर्व मुलांना सुखरुप बाहेर काढलं. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने सर्व जण वेळीच बाहेर आल्यामुळे जीवीतहानी टळली. मात्र, या आगीत व्हॅन जळून खाक झालीये. मात्र, ही आग कशामुळे लागली हे मात्र अजून कळू शकले नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा