भाजपच्या राज्य कार्यकारिणीत मराठा आरक्षणाचा ठराव मंजूर

October 6, 2016 4:38 PM0 commentsViews:

maratha_Arakshan06 ऑक्टोबर : राज्यात मराठा मोर्चे निघत असताना त्याचा दबाव आता राजकीय पक्षांवरही स्पष्टपणं जाणवू लागलाय. राज्यात आणि केंद्रात सरकार असलेल्या भाजपनं राज्य कार्यकारिणीत मराठा आरक्षणाचा ठराव मंजूर केलाय.

राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडला. कार्यकारिणीत हा ठराव बहुमतानं मंजूर झाला. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरणक्षण द्यावं अशी भूमिका कार्यकारिणीत मांडण्यात आली. मुख्य म्हणजे हा ठराव संमत होत असताना पंकजा मुंडे मात्र गैरहजर होत्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा