जुळून येता रेशीमगाठी !, भारताचे माजी आणि नेपाळच्या निवडणूक आयुक्त लग्नाच्या उंबरठ्यावर

October 6, 2016 7:24 PM0 commentsViews:

qureshi_ila_sharma06 ऑक्टोबर : भारत आणि नेपाळमधले संबंध अलिकडच्या काही काळात ताणलेले आहेत. नेपाळ चीनकडं झुकत असल्याची चर्चा अधूनमधून होत असते. पण असं असलं तरीसुद्धा वैयक्तिक पातळीवरचे संबंध मात्र थांबलेले नाहीत. उलट दोन्ही देशातल्या महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्ती जवळ येताना दिसतायत. भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी आणि नेपाळच्या सध्याच्या निवडणूक आयुक्त इला शर्मा हे ग्नाच्या उंबरठ्यावर उभे आहे असं वृत्त ‘द टेलिग्राफ’नं दिलंय.

एस वाय कुरेशी यावर बोलणं टाळतायत पण आतापर्यंत दोघांनी दोन वेळेस लग्न करण्याचा प्रयत्न केला पण कुठलं ना कुठलं कारण समोर आल्याचं त्यांनीच सांगितलंय. कुरेशी आणि इला शर्मा यांची भेट गेल्यावर्षी मेक्सिकोत एका कार्यक्रमादरम्यान झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्याचं समजतंय. इला शर्मा ह्या 49 वर्षांच्या आहेत तर कुरेशी हे सत्तरीकडे झुकलेत. कुरेशींचा अगोदरच घटस्फोट झालेला आहे तर शर्मांचे पती पंधरा वर्षांपूर्वीच माओवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेलेत. दोघांच्याही घरून ह्या विवाहाला विरोध आहे पण हे लग्न थांबणार नसल्याचं दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा