गिरण्यांच्या जागांची चौकशी होणार

April 22, 2010 11:52 AM0 commentsViews: 2

22 एप्रिल

गिरण्यांमधील मोक्याची जागा बिल्डरांच्या घशात घालून, अडगळीची जागा घरांच्या प्रकल्पांना दिली असेल, तर याबाबतची चौकशी करू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली.

विधानसभेच्या नियम 293 अंतर्गत मुंबईच्या प्रश्नासंदर्भात चर्चा उपस्थित करण्यात आली होती. त्याला उत्तर देताना मुख्यंमंत्र्यांनी ही घोषणा केली.

गिरणी कामगारांना दिवाळीपर्यंत घरे देण्याच्या आश्वासनासोबतच, मुंबईत वाढणार्‍या उंच इमारतींबाबतीत नगरविकास अधिकार्‍यांसह एक समिती बनवणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात सांगितले

close