मुंबापुरी झाली खड्डेपुरी !

October 6, 2016 10:15 PM0 commentsViews:

06 ऑक्टोबर : मुंबईत सध्या खड्‌ड्यांचं साम्राज्य आहे. जिकडे पाहावं तिकडं खड्डेच खड्डे दिसत आहेत. आणि अजूनतरी या खड्‌ड्यांच्या जाचातून मुंबईकरांची सुटका होण्याची शक्यता दिसत नाही. मुंबईतल्या खड्‌ड्यांचा आम्ही घेतलेला हा आढावा..

mumbai_potholsदेशाची आर्थिक राजधानी मुंबई सध्या खड्डेमय झालीय. मुंबई शहरात जिकडे तिकडे खड्‌ड्यांचंच साम्राज्य आहे. मुंबईकरांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय.आंतरराष्ट्रीय शहर समजल्या जाणा•या मुंबईतले रस्ते मात्र अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यांची अवस्था कशी आहे, त्याचा आढावा आम्ही घेतला.

राजकारणी खड्‌ड्यांवर राजकारण करतात. मंुबईत फक्त 83 खड्डे राहिले, 13 खड्डे राहिले असा दावा महापालिकेकडून केला जातो. विरोधक आंदोलनं करतात. पण यावर काही काळ मनोरंजन होतं. परिस्थिती मात्र बदलत नाही.

रस्ते आणि ट्रॅफिकवर महापालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. वार्षिक अर्थसंकल्पात हजारो कोटींचे आकडे रस्त्यांसाठी दाखवले जातात. पण रस्त्यांची ही अवस्था बघितली तर प्रश्न पडतो की हा पैसा नेमका जातो कुठे…

मुंबई खड्‌ड्यात
– 2012च्या सुमारास रस्त्यासाठी मास्टर प्लान तयार केला
– त्यानुसार मुंबईत दरवर्षी सुमारे 2500 कोटीचे रस्त्यांचे कंत्राटं दिले जातात.
– आतापर्यंत सुमारे 3500 हजार कोटींवर रस्ते बांधण्यात आले आहेत.
– यात सिमेंट आणि अस्फाल्टच्या रस्त्यांचा समावेश आहे.
– या व्यतिरिक्त 2013पासून रस्त्यांचे खड्डे भरण्यासाठी वेगळे कंत्राट दिले जाते.
– त्यासाठीची रक्कम सुरुवातीला 60 कोटी प्रती वषच् असून गेल्यावषच् ते 150 कोटीपर्यंत पोहचले होते.
– बीएमसीच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या रस्त्यांवर फक्त 35 खड्डे आहेत.
कारण खड्यांच्या तेवढ्याच तक्रारी त्यांच्यापर्यंत आल्या आहेत.
– गेल्यावर्षी खड्यासाठी असलेली पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टिम या वर्षी बंद करण्यात आली.
– त्यामुळे नागरिकांना हेच कळत नाहीए की त्यांच्या त्रासाला कारणीभूत कोण बीएमसी की राज्य सरकार ?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा